
मुंबई | Mumbai
श्रीलंकेपाठोपाठ (Sri Lanka) आणि पाकिस्तानचीही (Pakistan) अर्थव्यवस्था (economy) अखेरच्या घटका मोजू लागल्याचे निदर्शनास आले आहे...
पाकिस्तानातील लोकांवर सध्या अत्यंत वाईट वेळ आली आहे. परिस्थिती इतकी भयंकर आहे की, पाकिस्तानी नागरिक एलपीजी गॅस प्लास्टिकच्या पिशवीत भरून नेत आहेत. तसेच तेथील कर्मचाऱ्यांचे पगारदेखील रखडले आहेत. जेवणाचे हाल सुरु आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडर 10 हजार रुपयांवर पोहोचले आहे.
आर्थिक संकटापाठोपाठ पाकिस्तानात ऊर्जा संकटदेखील आले आहे. ऊर्जा संकटामुळे पाकिस्तानात मार्केट, मॉल आणि लग्नाचे हॉल बंद करण्याची वेळ आली आहे. अधिक वीज खेचणाऱ्या पंख्यांचे उत्पादनही थांबवण्यात आले आहे.
मार्च 2022 पर्यंत पाकिस्तानचे एकूण कर्ज 43 लाख कोटी पाकिस्तानी रुपये झाले होते. इम्राम खान यांनी तीन वर्षांत जनतेवर जवळपास दररोज 1400 कोटी रुपयांचे कर्ज वाढवल्याचा आरोप करण्यात येत आहे.