महागाईसह ‘या’ मुद्द्यांवर संसदेत चर्चा करा

राहुल गांधींची मागणी
महागाईसह ‘या’ मुद्द्यांवर संसदेत चर्चा करा

नवी दिल्ली / New Delhi - खासदारांनी जनतेचा आवाज बनून राष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करावी हे लोकशाहीचे मूळ तत्व आहे. मोदी सरकार विरोधी पक्षाच्या खासदारांना त्यांचे काम करु देत नाही. केंद्र सरकारने आता संसदेचा वेळ वाया घालवू नये. महागाई, कृषी कायदे आणि पेगॅसस प्रकरणी संसदेत चर्चा करावी असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पेगॅसस स्पायवेअर च्या माध्यमातून देशभरातील 40 हून अधिक पत्रकार, विरोधी पक्षनेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवण्यात आल्याचा आरोप जगभरातील 16 माध्यम समुहांच्या एका गटाने केला आहे. त्यामध्ये राहुल गांधी, प्रशांत किशोर, अभिषेक बॅनर्जी यांचीही नावे आहेत. त्यावरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोठा गोंधळ सुरु असून संसदेत विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पेगॅसस प्रकरणी केंद्र सरकारने संसदेत चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. जोपर्यंत केंद्र सरकार यावर चर्चा करणार नाही तोपर्यंत संसदेचे कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे.

आज ‘या’ सदस्यांवर लोकसभेचे अध्यक्ष कारवाई करणार

गेल्या दोन दिवसांत केंद्र सरकारने या गोंधळात दोन विधेयकं मंजूर करुन घेतली असली तरी सभागृहाचे कामकाज वारंवार स्थगित केले जात आहे. बुधवारी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारच्या निवेदनाचे तुकडे करुन ते अध्यक्षांच्या आसनासमोर भिरकावले होते. पडसाद त्याचे आज उमटण्याची शक्यता आहे. संबंधित सदस्यांवर लोकसभेचे अध्यक्ष कारवाई करण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com