Tiger
Tiger
देश-विदेश

वाघ संवर्धनात भारताचा विश्वविक्रम

भारतात तीन करोड पेक्षा अधिक वाघाचे फोटो काढले आहे.

Nilesh Jadhav

वाघ संवर्धनात भारताने नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. वर्षांत वाघांची संख्या दुप्पट झाल्याने "ऑल इंडिया टायगर एस्टिमेशनचा कॅमेरा ट्रॅप" गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील झाला आहे. या बाबतची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

त्यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे, "ऑल इंडिया टायगर एस्टिमेशनचा कॅमेरा ट्रॅप" गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील झाला आहे. हा एक महान क्षण आहे. आत्मनिर्भर भारत.!"

नवीन जनगणनेत वाघांची संख्या २९६७ आहे. तसेच भारतात तीन करोड पेक्षा अधिक फोटो काढले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com