पुणे -

जगातील 100 देशांना 110 कोटी करोना प्रतिबंधक लशीचे डोस पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देणार

आहे. कोव्हीशील्ड व नोवाव्हॅक्स या लशींच्या पुरवठ्यासाठी सीरमने युनिसेफ बरोबर तसा करार केला आहे.

ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेनकाच्या संयुक्त विद्यमातून विकसित करण्यात आलेल्या कोव्हीशील्ड लसीचे उप्तादन करण्याचा कारार सीरम इन्स्टिट्यूटशी झालेला आहे. तर नोवाव्हॅक्स या लशीच्या उप्तादनासाठी सीरमचा अमेरिकास्थित नोव्हॅक्स इंक कंपनशी झालेला आहे. युनिसेफचे कार्यकारी अधिकारी हेनरीटा फोर यांनी सीरमसोबत झालेल्या कराराची माहिती जाहीर केली आहे.

पॅन अमेरिका हेल्थ ऑर्गनायझेशनसह इतर अनेक संघटनांशी मिळून एकूण 100 देशांसोबत 110 कोटी लसीच्या डोसची ऑर्डर देण्यात आली आहे, असं हेनरीटा फोर यांनी सांगितलं. ही लस 3 अमेरिकन डॉलरमध्ये अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान,

जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांमध्ये लस पुरवठा करण्यासाठी सीरमसोबत काम करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असं युनिसेफने म्हटलं आहे.