
दिल्ली | Delhi
डॉलरच्या तुलनेत रुपयात सुरु असलेली घसरण सुरूच आहे. आज रुपयात पुन्हा एकदा ऐतिहासिक घसरण झाली आहे.
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ६१ पैशांनी घसरण झाली आहे. रुपया ८३.०१ रुपये प्रति डॉलरवर बंद झाला, जो आतापर्यंतचा नीचांक आहे. रुपयाच्या घसरणीमुळे सर्वच स्तरावर चिंता वाढला आहे.
रुपयामध्ये सुरु असलेल्या या घसरणीचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावरही होणार आहे. भारतात अनेक वस्तू या परदेशातून आयात केल्या जातात. यात पेट्रोलियम पदार्थांसह खाद्यतेल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा समावेश आहे. आयात वस्तूंवर खर्च वाढल्यास देशात विक्रीसाठी देखील त्या वस्तूंच्या किमती वाढणार आहे. रिफाइंड ऑईल, मोबाईल आणि लॅपटॉपपर्यंत अनेक वस्तू महाग होऊ शकतात.