अखेर IRCTC ला उपरती! 'तो' वादग्रस्त ड्रेसकोड बदलला

नेमकं काय होत प्रकरण?
अखेर IRCTC ला उपरती! 'तो' वादग्रस्त ड्रेसकोड बदलला

दिल्ली | Delhi

IRCTC च्या माध्यमातून अयोध्या, चित्रकूटसह भगवान श्री राम यांच्याशी संबंधित धार्मिक स्थळांच्या यात्रेसाठी भारतीय रेल्वेने रामायण एक्सप्रेस (Ramayana Express) ट्रेन सुरु केली आहे.

पण ही ट्रेन सर्विस स्टाफच्या ड्रेस कोडवरून वादात आली. रामायण एक्स्प्रेसमधील सेवा कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड भगवा होता. यावरून काही संतांनी सोमवारी रेल्वेला इशारा दिला होता. ट्रेनमधील सेवेतील कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड बदला, अन्यथा १२ डिसेंबरला दिल्लीत रामायण एक्स्प्रेस रोखू.

अखेर IRCTC ने एक पाऊल मागे घेत रामायण एक्सप्रेस मध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सचा पोशाख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. IRCTC ने सोमवारी संध्याकाळी हि माहिती दिली. IRCTC ने म्हंटले आहे की, रामायण एक्सप्रेसमध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सचा ड्रेसकोड (Dress Code) बदलण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय IRCTC ने नव्या गणवेशातील वेटर्सचे फोटो शेअर करत झालेला बदलही दाखवला आहे.

नवीन बदलांतर्गत रेल्वेने वेटर्ससाठी गणवेश म्हणून सामान्य शर्ट, ट्राउझर्स आणि पारंपारिक टोपी देण्यात आली आहे. मात्र, वेटर्स भगवी टोपी आणि हातमोजे घालणे सुरू ठेवतील.

ही रामायण एक्सप्रेस ७ नोव्हेंबर दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून रवाना झाली आणि प्रभू श्रीरामाशी संबंधित सर्व ठिकाणी फिरेल. 'देखो अपना देश' अंतर्गत या विशेष ट्रेनच्या प्रवास अयोध्या, सीतामढी, काशी, प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूट, नाशिक आणि नंतर प्राचीन किष्किंदा शहर हंपी येथील मंदिराना भेट देत पुढे जाईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com