रेल्वे कर्मचार्‍यांसाठी नवा प्रस्ताव
देश-विदेश

रेल्वे कर्मचार्‍यांसाठी नवा प्रस्ताव

13 लाख कर्मचार्‍यांना मिळणार लाभ

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

रेल्वेच्या कर्मचार्‍यांसह त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य विमा सुविधा आधीपासूनच सुरू आहे. मात्र, त्यात आता अतिरिक्त लाभ मिळणार आहेत. सध्या या नव्या आरोग्य विम्याचा प्रस्ताव रेल्वेच्या विचाराधीन असून तो प्रस्ताव मंजूर झाल्यास रेल्वेच्या 13 लाख कर्मचार्‍यांना लाभ मिळणार आहे.

या नव्या प्रस्तावानुसार कर्मचार्‍यांना अधिक उपचार मिळू शकणार आहेत. railways health insurance

आपल्या कर्मचार्‍यांच्या आरोग्य सुविधा वाढवण्याचा रेल्वेचा विचार असून त्यासाठी संपूर्ण आरोग्य विमा योजनेचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, असे रेल्वेने म्हटले आहे. या अंतर्गत उपचार, तसेच आपत्कालिन परिस्थितीत निर्माण होणार्‍या आर्थिक अडचणी सोडवता याव्यात या उद्देशानेच हा नवा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे रेल्वेने म्हटले आहे.

आपल्या नव्या प्रस्तावावर रेल्वेने आपले देशभरातील सर्व विभाग आणि उत्पादन यूनिट्सच्या महाव्यवस्थापकांकडून सूचना आणि शिफारशी मागवल्या आहेत. या सर्व सूचना आणि शिफारशी प्राप्त झाल्यानंतर या प्रस्तावावर रेल्वे अंतिम निर्णय घेणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com