भारत-चीन तणाव : राफेलचा युद्धसराव
देश-विदेश

भारत-चीन तणाव : राफेलचा युद्धसराव

हिमाचल प्रदेशच्या डोंगर रांगांमध्ये सराव

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या राफेल लढाऊ विमानांनी हिमाचल प्रदेशच्या डोंगर रांगांमध्ये रात्रीच्यावेळी उड्डाणाचा सराव सुरु केला आहे. India-China Standoff चीनला लागून असलेल्या 1,597 किलोमीटरच्या लडाख सीमारेषेवर अजूनही तणावाची स्थिती आहे. उद्या परिस्थिती चिघळली तर लगेच प्रत्युत्तराची कारवाई करण्याच्या दृष्टीने राफेलने रात्रीचा युद्धसराव सुरु करण्यात आला आहे. Indian Rafales

29 जुलैला राफेलच्या पहिल्या तुकडीने भारतीय भूमीवर लँडिंग केले. पहिल्या तुकडीत पाच राफेल विमाने आहेत. अंबाला एअर बसेवर राफेलची गोल्डन अ‍ॅरो स्क्वाड्रन तैनात असते. राफेलच्या दोन स्क्वाड्रन असणार आहेत. पहिली स्क्वाड्रन अंबाला बेसवर तर दुसरी भूतान जवळच्या हाशिमारा बेसवर तैनात असेल. भारताने फ्रान्स बरोबर 36 राफेल फायटर विमाने खरेदीचा करार केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com