रोगप्रतिकारकतेसाठी स्वदेशी करोना लसीत ‘अ‍ॅडज्युव्हँट्स’चा वापर

भारत बायोटेकचा अमेरिकन कंपनीशी करार
रोगप्रतिकारकतेसाठी स्वदेशी करोना लसीत ‘अ‍ॅडज्युव्हँट्स’चा वापर

नवी दिल्ली -

कोव्हॅक्सिन या करोना लसीची रोगप्रतिकारता वाढवण्यासाठी तसेच दीर्घकाळ प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी भारत बायोटेककडून

अ‍ॅडज्युव्हँट्स पदार्थाची मदत घेण्यात येणार आहे. अल्हायड्रोक्सिक्विम-2 रोगावरील औषधाची क्रियाशीलता वाढवणार्‍या या पदार्थामुळे लसीची क्षमता कमालीची वाढत असून, ती टोचल्यानंतर दीर्घकाळ करोना संबंधिताच्या आसपासही फिरकणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

माहितीनुसार, भारत बायोटेक सध्या कोव्हॅक्सिनची दुसर्‍या टप्प्यातील मानवी चाचणी करत आहे. यासाठी औषधी नियंत्रक महासंचालनालयाकडून परवानगी मिळाली असून, राष्ट्रीय विषाणू संस्थाच्या सहकार्याने लसीवर काम सुरू आहे.

रोगप्रतिकारक शक्तीच्या प्रतिसादाला अधिक प्रभावी बनवण्यासाठी अ‍ॅडज्युव्हँट्सची उपलब्धता वाढवण्याची आवश्यकता असल्याचे भारत बायोटेक कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एला यांनी म्हटले आहे. यामुळे दीर्घकाळासाठी प्रतिरोधक क्षमता विकसित होते. यासाठी अमेरिकेतील व्हिरोव्हॅक्स एलएलसी कंपनीशी करार करण्यात आला आहे. व्हिरोव्ॅहक्ससह आमची भागीदारी एक सुरक्षित आणि दीर्घकाळासाठी प्रतिरोधक क्षमता देणारी लस विकसित करण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असेही एला यांनी सांगितले. दरम्यान, भारत बायोटेकशी महत्त्वाचा असा करार केल्यामुळे आम्ही खूश आहोत, अशी प्रतिक्रिया व्हिरोव्हॅक्सचे डॉ. सुनील डेव्हिड यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com