९१ व्या स्थापना दिवशी भारतीय वायु सेनेला मिळाला नवा ध्वज; काय आहे वैशिष्टै

९१ व्या स्थापना दिवशी भारतीय वायु सेनेला मिळाला नवा ध्वज; काय आहे वैशिष्टै

उत्तर प्रदेश | Uttar Pradesh

आज भारतीय हवाई दल (Indian Air Force) चा ९१ वा स्थापना दिवस आहे. आज हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी (Air Chief Marshal V.R. Chaudhari) यांनी प्रयागराज येथे वार्षिक परेडदरम्यान या नवीन ध्वजाचे अनावरण (New Flag Of Air Force) केले. भारतीय एअर फोर्सने इंग्रजांच्या काळातील झेंड्याचा त्याग करत आपल्या ध्वजामध्ये बदल केला आहे.

७२ वर्षांनंतर हा बदल करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाला शुभेच्छा दिल्या आहेत. आज वायुसेना दिनानिमित्त प्रयागराजमध्ये एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे.

इंडियन एअस फोर्सच्या ध्वजामध्ये उजव्या कोपऱ्यात भारतीय वायुसेनेचे चिन्ह असून त्यामध्ये त्यात हिमालयन गरुड आणि अशोक स्तंभाची भर पडली आहे. अशा नव्या रुपात आता भारतीय वायू दलाचा नवा ध्वज दिमाखात फडकवण्यात आला.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे हवाई दलाकडून आज ९१ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने परेडचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी परेडची सलामी स्वीकारली. तसेच त्यांच्या हस्ते परेडमध्ये हवाई दलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले.

भारतीय हवाई दलाने एका निवेदनात माहिती दिली की, भारतीय हवाई दलाची मुल्य योग्य पद्धतीने दर्शवण्यासाठी नवीन ध्वज बनवण्यात आला आहे.तसेच ध्वजाच्या वरील डाव्या कोपऱ्यात फ्लाय साइडला हवाई दल क्रेस्ट देण्यात आले आहे.

८ ऑक्टोबर रोजी ‘भारतीय वायु सेना दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय वायु सेना ही जगातील सगळ्यात शक्तीशाली हवाई दलापैकी एक मानले जाते. भारतीय हवाई दलाची स्थापना ८ ऑक्टोबर १९३२ रोजी ब्रिटिशांनी रॉयल भारतीय हवाईदल म्हणून केली होती. सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलाचे प्रमुख होते.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com