भारतीय वायुदलाचे MiG-21 विमान क्रॅश; पायलटचा मृत्यू

भारतीय वायुदलाचे MiG-21 विमान क्रॅश; पायलटचा मृत्यू

दिल्ली | Delhi

MiG-21 या लढाऊ विमानाला पंजाबच्या मोगा शहराजवळ मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय वायू दलाचे MiG-21 हे लढाऊ विमान मध्यरात्री उशिरा कोसळून अपघात झाला. या अपघातात पालयट स्क्वॉड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला आहे.

हे विमान मध्यरात्री उशिरा कोसळून हा अपघात झाला आहे. पंजाबच्या मोगा शहराजवळ ही दुर्घटना घडली आहे. या विमानाने नियमित प्रशिक्षणासाठी राजस्थानच्या सूरतगढ स्टेशनवरुन उड्डाण घेतले होते. त्याचवेळी विमानाला हा अपघात झाला आहे.

यामध्ये विमानाचे पालयट स्क्वॉड्रन लीडर अभिनव चौधरी गंभीररित्या जखमी झाले होते. शुक्रवारी सकाळी पायलट अभिनव यांचा मृतदेह हाती घेण्यात आला आहे. या संपूर्ण अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अभिनव यांच्या मृत्यूवर हवाई दलाने शोक व्यक्त केला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरुन बरीच मेहनत घेतल्यानंतर पायलटचा मृतदेह बाहेर काढला, अशी माहिती भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com