MI-35 हेलिकॉप्टरवरुन S­ANT क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

डीआरडीओ आणि हवाई दलाची संयुक्त निर्मिती
MI-35 हेलिकॉप्टरवरुन S­ANT क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली -

भारतीय हवाई दलाच्या एमआय-35 हिंद गनशिप हेलिकॉप्टरवरुन सोमवारी स्टँड ऑफ अँटी टँक (S­ANT) क्षेपणास्त्राची

यशस्वी चाचणी करण्यात आली. ओडिशाच्या समुद्र किनार्‍यावर ही चाचणी झाली. अशाच आणखी एका क्षेपणास्त्राची पुढील 24 तासांत चाचणी घेण्यात येणार आहे. इंडियन डिफेन्स रिसर्च विंगने आपल्या वेबसाईटवर याची माहिती दिली आहे.

S­ANT हे हवेतून मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. डीआरडीओच्या इमरत या संसोधन संस्थेच्यावतीने आणि भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे. 7 ते 8 किमी रेंज असलेल्या हेलिना क्षेपणास्त्राची ही सुधारित आवृत्ती असून नव्या S­ANT क्षेपणास्त्राची रेंज 15 ते 20 किमी आहे.

भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्करातील एव्हिएशन कॉर्प्स यांची एकत्रितरित्या 4,000 S­ANT क्षेपणास्त्राची गरज आहे. सन 2021 च्या शेवटापर्यंत ही मागणी डीआरडीओकडून पूर्ण करण्यात येणार आहे.

एएलएच रुद्र एमके 4 आणि हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या ताफ्यांसाठी S­ANT हे हवेतून मारा करणारे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र विकसित करण्यात आलं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com