भारताला सर्वप्रथम मिळणार ‘कोविशिल्ड’चे पाच कोटी डोस - सीरम

भारताला सर्वप्रथम मिळणार ‘कोविशिल्ड’चे पाच कोटी डोस - सीरम

पुणे -

करोना प्रतिबंधक लस कोविशिल्डला जानेवारीत नियामक मंडळाकडून मान्यता मिळेल. त्यानंतर लसीचे चार-पाच कोटी

डोस सर्वप्रथम भारतात दिले जातील असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले, आमच्याजवळ कोविशिल्डचे चार-पाच कोटी डोस आहेत. एकदा आम्हाला काही दिवसांत लसीकरणाला परवानगी मिळाली की, आपण किती डोस घेऊ शकतो हे सरकारला निश्चित करावं लागेल. आम्ही जुलै 2021 पर्यंत सुमारे 30 कोटी डोसची निर्मिती करु.

2021 च्या आधी सहा महिने जागतिक स्तरावर डोस कमी पडतील पण यावर काही उपाय नाही. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबर 2021 पर्यंत इतर लस निर्मिती कंपन्याही डोसची पूर्तता करण्यास सक्षम होतील, असंही पुनावाला म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com