नवी दिल्ली -

भारत शेजारील सहा देशांना करोना प्रतिबिंधक लसीचे डोस पुरवणार आहे. या देशांमध्ये भूतान, मालदीव, बांग्लादेश, नेपाळ,

म्यानमार, सशेल्स देशांचा समावेश आहे. उद्यापासून (21 जानेवारी) लसीकरणाचे डोस पुरवले जाणार आहे. प्रथम बांग्लादेशला 20 लाख लसीचा साठा दिला जाणार आहे. भारताकडून देशांतर्गत गरज लक्षात घेऊन येणार्या काही काळात सहकारी देशांना टप्प्याटप्प्याने लसीकरणाचे टोस पुरवले जाणार आहे. असे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच काही दिवसांत श्रीलंका, अफगाणिस्तान, मॉरीशिअस देशांना लसीकरण साठा पुरवण्याच्या नियमक मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.

दरम्यान, जागतिक समुदायांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी भारताकडे एका विश्वसनीय सहकारी म्हणून पाहिले जाते ही कौतुकाची बाब आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी म्हटले आहे.