देशात ‘इतके’ नवे करोना रुग्ण

देशात ‘इतके’ नवे करोना रुग्ण

नवी दिल्ली / New Delhi - देशात गेल्या 24 तासांत 41 हजार 649 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 593 जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. करोनामुळे देशात आतापर्यंत तब्बल 4 लाख 23 हजार 810 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह 37 हजार 291 जणांनी करोनावर मात केली आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या 3 कोटी 7 लाख 81 हजार 263 वर पोहोचली आहे. आता देशातील सक्रीय रुग्ण संख्या कमी होऊन 4 लाख 8 हजार 920 वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात तब्बल 3 कोटी 16 लाख 13 हजार 993 जणांना करोनाची बाधा झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com