हिंदी महासागरात भारताचा दबदबा आणखी वाढणार
देश-विदेश

हिंदी महासागरात भारताचा दबदबा आणखी वाढणार

सहा P-8I विमाने खरेदी करण्यासाठी वाटाघाटी सुरु

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi - भारताच्या ताफ्यात P-8I या बहुउपयोगी विमानांचा समावेश होणार असल्यामुळे भारतीय नौदलाचा हिंदी महासागर क्षेत्रातील दबदबा आणखी वाढणार आहे. अमेरिकन बनावटीची आणखी चार विशेष विमाने P-8I multi-mission aircraft from the US पुढच्या वर्षीपर्यंत नौदलाला मिळणार आहेत. P-8I या विमानांमध्ये लांब अंतरावरुन शत्रुच्या पाणबुडीचा अचूक वेध घेण्याची, टेहळणीची आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगची क्षमता आहे.

बोईंगकडून अशी आणखी सहा विमाने घेण्याचा भारताकडे पर्याय आहे. यासंबंधी 2021 वाटाघाटी सुरु होऊ शकतात. याशिवाय सध्या भारतीय नौदलाकडे P-8A पोसी़डॉन विमान Indian Navy P-8A Poseidon aircraft असून समुद्री गस्त घालण्याबरोबरच पाणबुडीवर अचूक प्रहार करण्यासाठी सुद्धा हे विमान सक्षम आहे. हारपून ब्लॉक 2 मिसाइल आणि हलक्या टॉरपीडोस सुद्धा या विमानामध्ये आहेत. पाणबुडी बरोबर जहाजविरोधी क्षेपणास्त्र सुद्धा या विमानावरुन डागता येऊ शकते.

टेहळणी, शत्रू प्रदेशाची माहिती गोळा करण्याबरोबरच शत्रुच्या पाणबुडया, जहाजांना जलसमाधी देण्याच्या विविध रणनितीक दृष्टीने बोईंगने या विमानांची निर्मिती केली आहे. समुद्राशिवाय अन्यत्र सुद्धा या विमानाचा वापर करता येऊ शकतो. 2017 डोकलाम संघर्षाच्यावेळी आणि आता पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सुद्धा या विमानाचा वापर होत आहे.

2,200 किमी या विमानाची रेंज असून प्रतितास 789 किमी या वेगाने हे विमान उड्डाण करु शकते. आणखी अशी सहा P-8I विमाने खरेदी करण्यासाठी वाटाघाटी सुरु झालेल्या नाहीत असे नवी दिल्लीतील सरकारी अधिकार्‍याने सांगितले. नोव्हेंबर 2019 मध्येच संरक्षण खरेदी परिषदेने ही विमाने विकत घेण्यास मंजुरी दिली आहे. हिंदी महासागर क्षेत्रात चीनचा वावर वाढतोय. त्या दृष्टीने भारतीय नौदलासाठी ही विमाने अत्यावश्यक आहेत. म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान, इराण आणि पूर्व आफ्रिकी देशातील बंदरांवर सुद्धा चिनी युद्धनौका दिसत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com