देशात 24 तासांत 69 हजार 652 करोना  रुग्ण, 977 मृत्यू
देश-विदेश

देशात 24 तासांत 69 हजार 652 करोना रुग्ण, 977 मृत्यू

आतापर्यंत 20 लाख 96 हजार 665 रुग्णांची करोनावर मात

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

गेल्या 24 तासांत देशात तब्बल 69 हजार 652 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील करोना संक्रमितांच्या एकूण संख्येने 28 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर गेल्या 24 तासांत 977 रुग्णांचा बळी गेला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मााहितीनुसार, देशातील करोना संक्रमितांची एकूण संख्या 28 लाख 36 हजार 926 वर पोहोचली आहे. देशात सध्या 6 लाख 86 हजार 395 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर, आतापर्यंत 20 लाख 96 हजार 665 रुग्णांनी करोना वर मात केली आहे. तसेच, देशात आतापर्यंत करोना मुळे 53 हजार 866 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. Ministry of Health and Family Welfare

गेल्या काही दिवसांमध्ये देशात करोना च्या चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशात 9 लाख 18 हजार 470 करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर, आतापर्यंत देशात करोना च्या एकूण 3 कोटी 26 लाख 61 हजार 252 चाचण्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेशात करोना चे सर्वात जास्त रुग्ण वाढत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com