रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे भारताला मिळाले 30 लाख डोस

रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे भारताला मिळाले 30 लाख डोस

हैदराबाद - रशियाच्या करोना प्रतिबंधक लसीची पहिली खेप आज मंगळवारी भारताला मिळाली आहे. रशियाहून ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे 30 लाख डोस विशेष चार्टर्ड मालवाहू विमानाने पाठविण्यात आल्या.

हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी हे विमान दाखल झाले, अशी माहिती जीएमआर हैदराबाद एअर कार्गोने एका निवेदनातून दिली. आज पहाटे पावणे चारच्या सुमारास हे विमान विमानतळावर दाखल झाले.

हे मालवाहू विमान आल्यानंतर अतिशय जलद गतीने त्यातून लसीच्या मात्रा खाली उतरविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि अवघ्या दीड तासात विमान रशियाकडे रवाना झाले, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com