लसीकरण : भारताने अमेरिकेला टाकले मागे

केंद्र सरकारची माहिती
लसीकरण : भारताने अमेरिकेला टाकले मागे

नवी दिल्ली - देशात करोना प्रतिबंधक लशींचा तुटवडा असतानाही भारताने लसीकरण मोहिमेत अमेरिकेला मागे सोडले आहे. जागतिक आकडेवारीनुसार भारतात आतापर्यंत 17.2 कोटी लोकांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर अमेरिकेत हीच संख्या 16.9 कोटी इतकी असल्याची माहिती निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.

पॉल यांनी दिलेल्या एका आकडेवारीनुसार अमेरिकेच्या तुलनेत भारतात करोना लसीचा पहिला डोस सर्वाधिक नागरिकांनी घेतला आहे. त्याचबरोबर भारतातील लसीकरणाची आकडेवारी त्यांनी जाहीर केली. देशात 4 जूनपर्यंत 17.85 कोटी लोकांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस 4.56 कोटी लोकांनी घेतला असून आतापर्यंत एकूण 22.41 कोटी डोस दिले गेले आहेत. लसीरकरण मोहिमेंतर्गत 60 वर्षांवरील 43 टक्के लोकांचं लसीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान, चीनची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. तर इंग्लंडमध्ये 3.9 कोटी लोकांनी, तर जर्मनीत 3.8 कोटी लोकांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com