युरियासोबत जैविक खतांची खरेदी होणार अनिवार्य
देश-विदेश

युरियासोबत जैविक खतांची खरेदी होणार अनिवार्य

रसायनांचा वापर कमी करण्यासाठी केंद्राची योजना

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

कृषी क्षेत्रात रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी युरिया खताच्या प्रत्येक गोणीसोबत शेतकर्‍याला जैविक खताची खरेदी अनिवार्य करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

युरियसोबतच जैविक खते शेतकर्‍यांना द्यावीत असे रासायनिक खतांच्या संतुलित आणि सातत्यपूर्ण वापराबाबत स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाने केंद्र सरकारला सुचवले आहे. ठिबक सिंचनाचा वापर करून पिकांना खते देण्यात यावीत, असेही या कृती दलाने सुचवले आहे. या पद्धतीत पाण्यात खते मिसळली जावीत आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ती पिकांना देण्यात यावीत, असे कृती दलाने स्पष्ट केले. यामुळे पोषक तत्त्वांचा 30 ते 40 टक्के कमी होईल तसेच 50 टक्के पाण्याचा वापर कमी होईल. India Government to make purchase of bio-fertilisers compulsory with urea to reduce use of chemicals

रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी पीकनिहाय पोषकांची सूत्रे तयार करावीत, असेही कृती दलाने केंद्र सरकारला सुचवले आहे.

पंतप्रधान मोदींचे आवाहन -

कृषी क्षेत्रात युरियाचा वापर कमी व्हावा, यासाठी यंत्रणा तयार करण्यात यावी. युरियाचा वापर कमी करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच शेतकर्‍यांना केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com