...तरच करा करोना चाचणी; ICMR ने जारी केली नवी नियमावली

...तरच करा करोना चाचणी; ICMR ने जारी केली नवी नियमावली

दिल्ली | Delhi

देशात करोना आणि ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस झपाट्याने रुग्णवाढ होत आहे. अशावेळी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) सोमवारी एक नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केले आहेत. (India Corona test Guidelines)

करोना बाधित (corona positive) रुग्णाच्या संपर्कातील नेमक्या कोणाची चाचणी करण्यात यावी, याबाबत यात निकष निश्चित करण्यात आले असून आणखीही काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. (New guidelines for corona testing)

...तरच करा करोना चाचणी; ICMR ने जारी केली नवी नियमावली
PHOTO : मुकेश अंबानींकडून अलिशान हॉटेलची खरेदी; तब्बल ७३५ कोटींची गुंतवणूक

एखादी व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याच्या संपर्कातील लोकांना करोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची करोना चाचणी करण्याची गरज नाही. करोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीला जास्ती धोका नसेल अशाच व्यक्तींसाठी हा निर्णय आहे. मात्र, ज्यांचे वय जास्ती आहे किंवा त्यांना अन्य आजार आहे, त्यांना करोना चाचणी करावी लागणार आहे.

घरी होणाऱ्या चाचणीबाबत आयसीएमआरने महत्त्वाची बाब स्पष्ट केली. त्यानुसार, घरी केलेली चाचणी निगेटिव्ह आली आणि तुम्हाला ताप, खोकला, घसादुखी अशी लक्षणे असतील तर ही चाचणी अंतिम मानू नये. अशा व्यक्तीने आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे. करोनाची लक्षणे असलेल्या आणि हाय रिस्क गटातील रुग्णाला वेगवान उपचार मिळावे, या उद्देशाने आयसीएमआरने ही पावले उचलली आहेत.

...तरच करा करोना चाचणी; ICMR ने जारी केली नवी नियमावली
Irrfan Khan Birth Anniversary : आठवणीतला इरफान खान…

तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या लोकांची करोना चाचणी मात्र केली जाणार आहे असही सांगण्यात आले आहे. याबरोबरच होम आयसोलेशनच्या नियमांनुसार जे बरे झाले आहेत किंवा रुग्णालयातून घरी परतले आहेत तसेच, जे इतर राज्यातून प्रवास करून परत आले आहेत अशा लोकांनाही कोविड चाचणी करण्याची गरज नाही असही या मार्गदर्शक तत्वात म्हटले आहे.

...तरच करा करोना चाचणी; ICMR ने जारी केली नवी नियमावली
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचे ब्रेकअप; पण...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com