India-Canada Row : वाढत्या तणावात महिंद्राने कॅनडातील व्यवसाय केला बंद

India-Canada Row : वाढत्या तणावात महिंद्राने कॅनडातील व्यवसाय केला बंद

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

कॅनडाच्या पंतप्रधानांनी खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढला. आधी दोन्ही देशांच्या परराष्ट्र अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आणि आता भारत सरकारने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे.

भारत-कॅनडा वादाचा परिणाम आता व्यवसायावरही दिसून येत आहे. कारण महिंद्रा अँड महिंद्राने आता एक मोठी घोषणा केली आहे. कॅनडा-आधारित उपकंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनने काम थांबवले असल्याची घोषणा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने केली आहे.

India-Canada Row : वाढत्या तणावात महिंद्राने कॅनडातील व्यवसाय केला बंद
भारताचा कॅनडाला मोठा झटका; व्हिसा सेवा थांबवली

रेसनला कॅनडाकडून 20 सप्टेंबर 2023 रोजी ऑपरेशन्स बंद करण्याच्या मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे मिळाली आहेत, ज्याची माहिती कंपनीला देण्यात आली आहे, अशी माहिती महिंद्रा अँड महिंद्राने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.

यानंतर रेसनने आपले काम बंद केले. महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स आज गुरुवारी 3 टक्क्यांहून अधिक घसरून 1,584.85 रुपयांवर पोहोचले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

India-Canada Row : वाढत्या तणावात महिंद्राने कॅनडातील व्यवसाय केला बंद
राज्यात सात महिन्यात पंधराशेहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com