केंद्राचा दणका! २० Youtube Channel सह २ वेबसाइट्सवर बंदी... काय आहे कारण?

केंद्राचा दणका! २० Youtube Channel सह २ वेबसाइट्सवर बंदी... काय आहे कारण?

दिल्ली | Delhi

चीनच्या अॅप्सवर बंदीची कारवाई केल्यास दीड वर्ष होत असताना आता केंद्र सरकारने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रविरोधी माहिती त्याचप्रमाणे खोट्या बातम्या प्रसारीत केल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारनं (Government of India) २० युट्युब चॅनेल्स आणि २ वेबसाइट्सवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

गुप्तचर यंत्रणेसोबत (Intelligence agencies) केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं (Ministry of Information & Broadcasting) संयुक्तपणे याबाबत आधी आढावा घेऊन अखेर ही कारवाई केली आहे.

काश्मीर प्रश्न, भारतीय सैन्य, भारतातील अल्पसंख्याक समुदाय, राम मंदिर, शेतकरी आंदोलन, सीडीएस (CDS)जनरल बिपिन रावत इत्यादी विषयांवर चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवण्यासाठी या चॅनेलचा वापर केला जात होता. त्यामुळे कारवाईचे आदेश दिले आहेत. IT कायदा २०२१ अंतर्गत करण्यात आलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे

नया पाकिस्तान ग्रुप (NPG) भारतविरोधी प्रचार मोहीम चालवण्यात गुंतलेला आहे. ते पाकिस्तानातूनच चालवले जात होते. त्यांच्याकडे अनेक यूट्यूब चॅनेल आहेत. त्याशिवाय काही स्वतंत्र यूट्यूब (YouTube) चॅनेल देखील आहेत, जे नया पाकिस्तान ग्रुपशी संबंधित नाहीत. तसेच लोकशाहीविरोधी काम करणाऱ्या या युट्युब चॅनेल्सद्वारे आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांमध्येही चुकीची माहिती प्रसारीत केली जाऊ शकते, अशी भीती केंद्रानं व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com