चीनसह ‘या’ देशांतील टीव्हीच्या आयातीवर बंदी
देश-विदेश

चीनसह ‘या’ देशांतील टीव्हीच्या आयातीवर बंदी

व्होकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत योजनेला चालना

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

व्होकल फॉर लोकल Local For Vocal आणि आत्मनिर्भर भारत योजनेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं भारतात रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घातली आहे. परदेश व्यापार महासंचालनालयानं (डीजीएफटी) Directorate General of Foreign Trade (DGFT) यासंदर्भात एक पत्रक काढलं आहे. रंगीत टीव्हीसाठी असलेल्या आयात धोरणात बदल केले गेले असल्याची माहिती यात देण्यात आली आहे. तसंच मुक्त या श्रेणीतून हटवून प्रतिबंधित या श्रेणीत टाकण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे. estrictions on colour TV imports

नुकतंच सरकारने देशांतर्गत वस्तूंचं उत्पादन वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. तसंच कमी आवश्यकता असलेल्या वस्तूंच्या आयातीत कपात करण्यासाठीही काही निर्णय घेतले आहेत. चीन आणि व्हिएतनाम व्यतिरिक्त भारत हाँगकाँग, मलेशिया, कोरिया, इंडोनेशिया, जर्मनी आणि थायलंडसारख्या देशांकडूनही रंगीत टीव्ही आयात करतो.

वाणिज्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार भारतात रंगीत टीव्हीची सर्वाधिक आयात चीन आणि व्हिएतनाममधून होतं. 2019 या आर्थिक वर्षात देशात तब्बल 7 हजार 120 कोटी रूपयांच्या रंगीत टीव्हीची आयात करण्यात आली होती. तर आर्थिक वर्ष 2020 मध्ये यात घट होऊन ती 5 हजार 514 कोटी रूपये इतकी झाली, 2019 या आर्थिक वर्षात रंगीत टीव्हीच्या आयातीत 52.86 टक्क्यांची वाढ झाली होती. परंतु आता सरकारनं रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारची ही बंदी 14 इंचाच्या टीव्हीपासून 41 इंच आणि त्यावरील टीव्हीसाठी लागू असणार आहे. तर दुसरीकडे पत्रकानुसार 24 इंचापेक्षा कमी असलेल्या लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले टीव्हींवरही सरकारनं बंदी घातली आहे. डीजीएफटीच्या माहितीनुसार रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्यासाठी धोरणांमध्ये काही बदलही करण्यात आले आहे. जर बंदी घातलेल्या या वस्तूंपैकी कोणतीही वस्तू आयात करायची असेल तर संबंधित व्यक्तीला डीजीएफटीकडून त्याचा परवाना घ्यावा लागेल. परवाना देण्याची प्रक्रिया स्वतंत्रपणे डीजीएफटीद्वारे जारी केली जाणार आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com