Corona Update : स्वातंत्र्यदिनी दिलासा! भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, महाराष्ट्रातील स्थिती काय?

'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
Corona Update : स्वातंत्र्यदिनी दिलासा! भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, महाराष्ट्रातील स्थिती काय?

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ४० हजारांच्या आसपास रुग्ण समोर येत आहेत. मात्र स्वातंत्र्यदिनी करोनाबाधितांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३६ हजार ०८३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ४९३ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ३७ हजार ९२७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. भारतातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २१ लाख ९२ हजार ५७६ इतकी झाली असून आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १३ लाख ७६ हजार ०१५ वर पोहोचली आहे. देशात सध्या ३ लाख ८५ हजार ३३६ रुग्णांवर (Corona active patient) उपचार सुरु आहेत. दरम्यान देशात आतापर्यंत ४ लाख ३१ हजार २२५ जणांचा मृत्यू (Corona Death) झाला आहे.

Corona Update : स्वातंत्र्यदिनी दिलासा! भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, महाराष्ट्रातील स्थिती काय?
...तर राज्यात पुन्हा लॉकडाउन लावावा लागू शकतो; मुख्यमंत्र्यांचा इशारा

दरम्यान केरळमध्ये(Keral corona update) करोनाबाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. केरळ राज्यात गेल्या २४ तासांमध्ये १९ हजार ४५१ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर १०५ रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत ५४ कोटी ३८ लाख ४६ हजार २९० करोनावरील लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर गेल्या २४ तासांत ७५ लाख ५० हजार ५५३ नागरिकांना लस देण्यात आली आहे.

करोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये?

तसेच ऑगस्ट महिन्यात करोनाची तिसरी लाट येईल, अशी शक्‍यता अभ्यासकांकडून व्यक्‍त होत असताना राज्याच्या करोना टास्क फोर्सने सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तवली आहे, ही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच शनिवारी बारामतीत पत्रकारांना दिली. तिसरी लाट वाढू नये, यासाठी कराव्या लागणाऱ्या नियोजनाच्या संदर्भात त्यांनी प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

महाराष्ट्रातील स्थिती?

राज्यात शनिवारी दिवसभरात करोनातून बरे झालेल्यांपेक्षा नवीन बाधितांची संख्यी ही अधिक आढळली आहे. याशिवाय, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी भर पडली आहे. शनिवारी दिवसभरात राज्यात ५ हजार ७८७ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ५ हजार ३५२ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. याचबरोबर १३४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com