नवी दिल्ली -

करोना चाचण्यांची संख्या वाढवावी अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या

आहेत. वाढत्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

ते म्हणाले, सर्व राज्यांनी कोरोना टेस्टिंगची व्याप्ती वाढवावी. 70 टक्के आरटीपीसीआर टेस्ट झाल्या पाहिजेत. देशातील आणि राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला तरी चालेल, परंतू चाचण्या वाढवाव्यात. योग्य पद्धतीने स्वॅब घेणे खूप गरजेचे आहे, तसेच त्याची चाचणी होणे देखील खूप महत्वाचे आहे.

कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी आणि कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णांचा शोध आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. युद्धपातळीवर हे काम करण्याची गरज आहे. आपल्याला आता पुरेसा अनुभव आलेला आहे. तसेच सोबत अन्य स्त्रोतांसह लसही आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचना महत्वाच्या आहेत. पुन्हा एकदा एक आव्हानात्मक परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा लोक बेजबाबदार दिसत आहेत.

देश कोरोनाच्या पहिल्या टप्प्याच्या पुढे निघून गेला आहे. बरीच राज्ये यापूर्वीच पहिल्या टप्प्यातील सर्वोच्च पातळीच्या पुढे गेली आहेत. तर अनेक राज्ये या दिशेने वाटचाल करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाईट कर्फ्यूला पाठिंबा दिला आहे. मात्र नाईट कर्फ्यूला आपण मकोरोना कर्फ्यूफ हा शब्द वापरायला हवा, असा सल्लाही पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे. काही लोक हा प्रश्न उपस्थित करतात की कोरोना फक्त रात्रीच पसरतो का? यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, नाईट कर्फ्यूचा फॉर्म्युला जगभरात वापरण्यात आला आहे.

कोरोना कर्फ्यू रात्री 10 वाजता सुरू करुन सकाळपर्यंत ठेवला पाहिजे. लोकांना सावध करण्यासाठी हे उपयुक्त ठरेल. आपल्याला ढशीीं, ढीरलज्ञ, ढीशरीं यावर भर द्यावा लागेल. मायक्रो कंटेनमेंट झोनवर भर देणे गरजेचं आहे. कंटेनमेंट झोनमध्ये प्रत्येकाची कोरोना टेस्ट झाली पाहिजे. याचा जरुर फायदा होईल. एखाद्या व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याच्या संपर्कात येणार्या कमीतकमी 30 जणांची तपासणी केली पाहिजे, असे सल्ले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत दिले आहेत.

'लसीकरण उत्सव' साजरा करण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना 'लसीकरण उत्सव' साजरा करण्याचे आवाहन केले. 11 एप्रिल ही महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. या दरम्यान आपण सर्वजण 'लसीकरण उत्सव' साजरा करूया, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. लसीकरण महोत्सवात जास्तीत जास्त लोकांना लसी द्यावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. मी देशातील तरूणांना अशी विनंती करतो की तुमच्या आसपास ज्यांचे वय 45 वर्षांपुढे आहे त्यांना लसीकरणासाठी सर्वतोपरी मदत करावी, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.