दिल्ली l Delhi

अलिकडच्या काही महिन्यांत महागाई वाढल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान आज पेट्रोल, डीजलसह एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही वाढ करण्यात आली आहे. या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांच्या समस्या आणखी वाढवणार आहेत. मुख्यत: डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतीचा परिणाम सामान्यांवर होणार आहे.

तेल कंपन्यांनी आज पेट्रोल व डीजलच्या दरात प्रत्येकी प्रति लिटर ३५-३५ पैशांची वाढ केली आहे. तसेच एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये आज (गुरुवार) पेट्रोलचा दर प्रति लिटर ८६.६५ रुपयांवर पोहोचला. तर डिझेलचा दर ७६.८३ रुपयांवर पोहोचला आहे. याच बरोबर, मुंबईत पेट्रोल ९३.२० रुपये आणि डिझेल ८३.६७ रुपये लिटर, चेन्नईत पेट्रोल ८९.१३ आणि डिझेल ८२.०४ रुपये लिटर, कोलकात्यात पेट्रोल ८८.०१ रुपये तर डिझेल ८०.४१ रुपये लिटर, तर नोएडामध्ये पेट्रोल ८५.९१ रुपये आणि डिझेल ७७.२२ रुपये लीटरवर पोहोचले आहे.

दरम्यान, LPG सिलिंडरमध्ये २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत ७१० रुपये १४ किलोग्रॅमच्या सिलिंडरसाठी मोजावे लागणार आहेत. यापूर्वी व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किंमतीत १९० रुपयांची वाढ करण्यात आली होती.

अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लावण्यात आला होता. मात्र, या अधिभाराचा बोजा सर्वसामान्यांवर पडणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले होते. मात्र, अर्थसंकल्पानंतर दोनच दिवसांनी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरची दरवाढ करण्यात आली आहे.