नीरज चोप्राच्या फॉलोअर्समध्ये २८ लाखांची वाढ

नीरज चोप्राच्या फॉलोअर्समध्ये २८ लाखांची वाढ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भालाफेक खेळात भारताला सुवर्णपदक (Gold medal) मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा (Neeraj Chopra) सोशल मिडीयावरदेखील ट्रेंड (Trends) होऊ लागला आहे...

इन्स्टाग्रामवर (Instagram) नीरजचे २ लाख फॉलोअर्स होते. गेल्या काही दिवसांतच ही संख्या झपाट्याने वाढून त्याच्या फॉलोअर्सची (Followers) संख्या ३० लाखांपर्यंत पोहोचली आहे.

त्याच्या सोशल मिडीयाच्या (Social media) अकाऊंटवरील जुने व्हिडीओ, फोटोंना मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळत आहेत. तसेच प्रतिक्रियांचादेखील पाऊस पडत आहे.

ट्विटरवरदेखील (Twitter) अशीच काही परिस्थिती आहे. नीरजची एका पोस्ट सध्या वेगाने व्हायरल होत आहे. यशाची इच्छा तुम्हाला झोपू देत नाही, कष्टांशिवाय दुसरे काहीही चांगले वाटत नाही.

सतत काम करूनदेखील थकायला होत नाही, असे झाले तर नक्की समजा की तुमचे यश इतिहास लिहिणार आहे, असे नीरजने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com