
दिल्ली | Delhi
आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्था अशी ओळख असलेल्या बीबीसीच्या (British Broadcasting Corporation) कार्यालयात आयकर विभागाची (Income Tax) पथकं दाखल झाली आहेत. आयकरच्या नियमांचं उल्लंघन झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयकर विभागानं सर्वेक्षण सुरु केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तिकर विभागाकडून बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र प्राप्तिकर विभागाचे अधिकारी बीबीसीच्या कार्यालयात तपासणी तसेच चौकशी करत असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान BBC ने काही दिवसांपूर्वीच इंडिया: द मोदी क्वेश्चन (India: The Modi Question) हा एक माहितीपट (डॉक्युमेंट्री) प्रसिद्ध केली होती. या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून गुजरात दंगलीवर भाष्य करण्यात आले होते. ही दंगल झाली तेव्हा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री होते. त्यामुळे आयकर विभागाच्या या कारवाईबद्दल अनेक तर्क वितर्क लढविण्यात येत आहेत.
काँग्रेसने या छापेमारीचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील आधारीत डॉक्युमेंट्रीशी जोडला आहे. "आधी बीबीसीची डॉक्युमेंट्री आली, त्यानंतर बॅन जाहीर करण्यात आला. आता बीबीसीवर इनकम टॅक्सचा छापा पडला आहे, अघोषित आणीबाणी आहे," असं ट्वीट काँग्रेने केलं आहे.