आयकर विभाग  देणार 10 तपास संस्थांना पॅन, बँक खात्यांची माहिती
देश-विदेश

आयकर विभाग देणार 10 तपास संस्थांना पॅन, बँक खात्यांची माहिती

सरकारचा आदेश जारी

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

एकात्मिक दहशतवादविरोधी धोरणांतर्गत सीबीआय आणि राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएसह देशातील 10 तपास आणि गुप्तचर संस्थांना, 10 investigative and intelligence agencies, including the CBI व्यक्ती व उद्योगांच्या पॅन कार्डची तसेच बँक खात्यांची सविस्तर माहिती उपलब्ध करण्याचा निर्णय आयकर विभागानेे घेतला आहे. The Income Tax (I-T) Department

आयकर विभागाचे धोरण निर्धारित करणार्‍या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने याबाबतचा सरकारी आदेश जारी केला आहे. केंद्र सरकारने अधिकार प्रदान केलेल्या दहा तपास आणि गुप्तचर यंत्रणांकडून मागणी झाल्यास आयकर विभागाने व्यक्ती आणि संस्था किंवा उद्योगाशी संबंधित सर्व आवश्यक ती माहिती तातडीने उपलब्ध करून द्यावी. यात पॅन, टॅन क्रमांक, बँक खात्यांशी संबंधित माहिती, आयकर विवरण आणि टीडीएस आदी माहितीचा समावेश असेल, असे आदेशात नमूद आहे.

ही सर्व माहिती राष्ट्रीय गुप्तचर ग्रीडच्या माध्यमातूनच पुरविण्यात यावी. संशयास्पद व्यवहार, अतिरेक्यांना पुरवला जाणारा निधी आणि कर बुडवेगिरी यासारख्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने या ग्रीडची स्थापना केली आहे.

या अंतर्गत ज्या संस्थांना माहिती प्राप्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहे, त्यात सीबीआय, महसूल गुप्तचर संचालनालय, अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि जकात मंडळ, केंद्रीय सचिवालय, आयबी, जीएसटी गुप्तचर महासंचालनालय, मादक द्रव्य नियंत्रण विभाग, आर्थिक गुप्तचर विभाग आणि राष्ट्रीय तपास संस्थेचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com