प्रणव मुखर्जी
प्रणव मुखर्जी
देश-विदेश

प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीत सुधारणा

अभिजीत मुखर्जी यांनी दिली माहिती

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली |New Delhi -

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची अशी माहिती त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी रविवारी सकाळी ट्विटद्वारे दिली. तर प्रकृती स्थिर असली तरी अद्याप प्रणव मुखर्जी यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणार्‍या आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलने दिली आहे. Former President Pranab Mukherjee

84 वर्षीय माजी राष्ट्रपतींवर 10 ऑगस्टला मेंदू शस्त्रक्रिया झाली होती, यावेळी त्यांच्या मेंदूमधून रक्ताच्या गाठी काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांचा करोनाचा चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, 13 ऑगस्टला प्रणव मुखर्जी कोमात गेले असल्याचे रुग्णालयाने सांगितले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com