IIT Mumbai
IIT Mumbai
देश-विदेश

आयआयटी IIT मुंबईच्या गेट परीक्षांच्या तारखा जाहीर !

करोनाची परीस्थिती पाहता परीक्षांच्या तारखामध्ये अंतर ठेवण्यात आले आहे.

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

आयआयटी मुंबईने गेट 2021 (IIT Mumbai GATE 2021) परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा 5 ते 7 फेब्रुवारी आणि 12 ते 13 फेब्रुवारीपर्यंत असेल. करोनाची परीस्थिती पाहता परीक्षांच्या तारखामध्ये अंतर ठेवण्यात आले आहे.

या वेळी परीक्षेत दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या परीक्षेत दोन नवीन विषयांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या वेळेस शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी देखील परीक्षा देऊ शकणार आहे.

प्राध्यापक दीपंकर चौधरी, उपेंद्र भांडारकर आणि मोहम्मद असलम यांच्या समितीने हे दोन्ही बदल केले आहेत. नवीन दोन विषयांमध्ये पर्यावरण विज्ञान Environmental Science आणि सामाजिक विज्ञान - मानवता Social Science - Humanities विषयांचा समावेश आहे. आता या परीक्षेत एकूण 27 विषयांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच पहिले परीक्षेला बसण्यासाठी 10+2+4 चे मानक होते तेच बदलून आता 10+2+4 चे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी https://gate.iitb.ac.in या संकेस्थळाला भेट देऊ शकता

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com