दिल्ली l Delhi

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) लोकांना अनधिकृत पद्धतीने डिजिटल प्लॅटफॉर्मवर तसेच मोबाईल अॅपद्वारे कर्जासाठी केलेला अर्ज यावरून सावध रहाण्यास सांगितले आहे.

आरबीआयने बुधवारी एक प्रसिध्दी पत्रक जारी करत सांगितले की, लोक आणि छोटे व्यावसायिक पटकन मिळणाऱ्या आणि कोणत्याही कटकटीशिवाय मिळणाऱ्या कर्जाच्या आमिषाला बळी पडू लागले आहेत. अती व्याजदर आणि मागील दरवाज्याने जास्त पैसे उकळले जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे. यामाध्यमातून तुमच्या कागदपत्रांमध्ये केवळ घोटाळाच केला जात नाही तर उच्च व्याजदराने लोन देखील दिलं जातं. शिवाय या पद्धतीमध्ये पैशांच्या रिकव्हरीचा मार्ग देखील चुकीचा असतो.

रिझर्व्ह बँकेने अशी माहिती दिली आहे की, या प्लॅटफॉर्म्सवरून कर्ज घेणाऱ्यांना जास्त दराने व्याज फेडावं लागतं. यामध्ये विविध प्रकारचे छुपे अतिरिक्त शुल्क असतात. शिवाय फोनच्या माध्यमातून तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाण्याचीही भीती असते. 'सामान्य लोकांना सावध केले जाते आहे की, ऑनलाईन/मोबाईल अॅपद्वारे कंपनी/ फर्म कर्जाची ऑफर देणाऱ्या अशा बेईमान उपक्रमांची पडताळणी करा'

ग्राहकांनी त्यांची कोणतीही माहिती विशेषत: केवायसी डॉक्यूमेंट्स कोणत्याही अनोळखी व्यक्तीला, अनधिकृत अॅप्सना देणे चुकीचे आहे. अशी घटना झाल्यास संबंधित एजन्सीकडे तक्रार दाखल करा. बँका, आरबीआयमध्ये रजिस्टर्ड नॉन बँकिंग आर्थिक कंपन्या (NBFC) आणि सरकारची मंजुरी असणाऱ्या अन्य संस्था यांच्याकडून तुम्ही अधिकृतपणे कर्ज घेऊ शकता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गुरुग्राम आणि हैदराबादमधील चार कर्ज अॅप फायनान्स कार्यालयांवर हल्लीच छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये दोन कार्यालयं गुरुग्राम आणि दोन हैदराबादमध्ये आहेत. कंपनीविषयी तपास केला असता संपूर्ण फसवणुकीचं प्रकरण समोर आलं. यामध्ये एका चिनी नागरिकाचाही समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. हैदराबादचे सह पोलीस आयुक्त अविनाश मोहंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चार कार्यालयांमध्ये कर्ज देणार 30 अॅप कार्यरत होते. ज्याच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक होत होती. तसेच कर्ज फेडण्यासाठी कंपनीने केलेल्या जाचामुळे सॉफ्टवेअर इंजीनिअर, तेलंगानाची एक महिला एग्रिकल्चर ऑफिसर यांच्यासह 3 लोकांनी डिफॉल्ट केल्यामुळे शोषण करण्यात आल्यामुळे आत्महत्या केली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे काही तास उशिरा पैसे दिल्यानंतरही त्यांना त्रास दिला जात असल्याची तक्रार बर्याच लोकांनी पोलीस ठाण्यात केली आहे.