CBSE पाठोपाठ ICSE बोर्डाचा मोठा निर्णय

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत घेतला 'हा' निर्णय
CBSE पाठोपाठ ICSE बोर्डाचा मोठा निर्णय

दिल्ली l Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात न घालण्याच्या दृष्टीने अनेक परीक्षा रद्द करण्यात येत आहे. सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता

आयसीएसई (ICSE) बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान बारावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली नसून लवकरच नवीन तारीख जाहीर होणार आहे. याआधी बोर्डाकडून दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार या दोन्ही बोर्डांच्या पावलावर पाऊल ठेवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अद्याप परीक्षेचा निर्णय झालेला नाही. १६ एप्रिलच्या परिपत्रकानुसारच सध्या निर्णय ठेवण्याचे निर्देश आहेत. म्हणजेच सध्या ही परीक्षा स्थगित आहे. बोर्डातून बारावीच्या ऑफलाईन परीक्षा या लवकरच घेतल्या जाणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात करोना परिस्थिती पाहून त्याबाबतचा निर्णय होईल असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मागच्या वर्षी करोना संकटामुळे आयसीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना आधीच्या परीक्षांतील गुण, वर्षभरातील कामगिरी आणि प्रॅक्टिकल्सचे गुण यांच्या आधारे गुण देण्यात आले होते. तर बारावीच्या विद्यार्थ्यांचे दोन पेपर झाले होते. उर्वरित विषयांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच बारावीच्या मुलांनाही आधीच्या परीक्षांतील गुण, वर्षभरातील कामगिरी आणि प्रॅक्टिकल्सचे गुण यांच्याआधारे गुण देण्यात आले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com