मास्क न वापरणार्‍यांमुळे करोनाचा फैलाव

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे मत
मास्क न वापरणार्‍यांमुळे करोनाचा फैलाव

नवी दिल्ली | New Delhi -

मास्क न वापरणार्‍या बेजबाबदार लोकांमुळे करोनाचा फैलाव होत असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ICMR

दरम्यान भारतात 1 सप्टेंबरपासून अनलॉक 4 प्रक्रियेला सुरुवात होणार असताना करोनाबाधित रुग्णसंख्या 31 लाखांच्या पुढे गेली असून आतापर्यंत 58 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बेजबाबदार, काळजी न घेणारे लोक जे मास्कचा वापर करत नाहीत त्यांच्यामुळेच भारतात करोना महामारीचा फैलाव होत आहे, असं बलराम भार्गव यांनी सांगितलं आहे. दरम्यान भारतातील रिकव्हरी रेट वाढला अशून 75.92 टक्के झाला आहे. गेल्या 25 दिवसांत 100 टक्क्यांहून अधिक प्रगती झाली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी यावेळी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, भारतातील रिकव्हरी रेट अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या तुलनेत 3.4 टक्के जास्त आहे. एकूण केसेसच्या तुलनेत अ‍ॅक्टिव्ह केसेस 22.2 टक्के आहेत. तर रिकव्हरी रेट 75 टक्के आहे.

भारतातील करोना मृत्यू दर 1.58 टक्के असून इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. गेल्या 24 तासात करोना रुग्णांच्या अ‍ॅक्टिव्ह केसेस 6400 ने कमी झाल्या आहेत, अशी माहिती राजेश भूषण यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, एकूण करोना रुग्णांच्या तुलनेत फक्त 2.7 टक्के रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. 1.92 टक्के रुग्ण आयसीयूत आहेत. तर 0.29 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

बलराम भार्गव यांनी यावेळी करोना लसीसंबंधीही माहिती दिली. तीन करोना लस सध्या स्पर्धेत पुढे आहेत. सिरम इन्सिट्यूटची लस दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात आहे. भारत बायोटेक आणि नूर्वीी उरवळश्रर यांच्या लसीने पहिला टप्पा पार केला आहे, असेही ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com