आता RT-PCR मधूनच होणार Omicronचे निदान; 'त्या' किटला ICMR ची मंजुरी

आता RT-PCR मधूनच होणार Omicronचे निदान; 'त्या' किटला ICMR ची मंजुरी

दिल्ली | Delhi

करोनाचा (covid19) नवा व्हेरीअटं ओमीक्रॉन (Omicron variant) हा जगभरात झपाट्याने पसरत आहे. भारतातही २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून ओमीक्रॉनची १८०० हुन अधिक प्रकरण नोंदवली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉनविरोधातील लढ्यामध्ये एक नवं साधन आरोग्य यंत्रणेच्या हाती आलं आहे.

देशात ओमिक्रॉनचं संकट वाढत असताना आता ICMR ने आज ओमिशुअर या कीटला (Omisure kit) मंजूरी दिली आहे. ओमिशुअर कीटच्या माध्यमातून ओमिक्रॉन व्हेरीअटंची लागण झाली की नाही याचं निदान करता येणार आहे. टाटा मेडिकलने ही किट बनवली असून त्याला ओमिशुअर असं नाव देण्यात आले आहे.

ओमिशुअरमुळे आता जेनोम सिक्वेन्सिंगसाठी न पाठवता देखील ओमायक्रॉनच्या बाधेचं निदान करणं शक्य होणार आहे. ओमिशुअर आरटीपीसीआर किट आरोग्य यंत्रणेच्या हाती आल्यामुळे ओमायक्रॉनचं लवकरात लवकर निदान करून जास्तीत जास्त व्यक्तींच्या चाचण्या करणं शक्य होणार आहे.

भारतात आतापर्यंत १ हजारे ८९२ रुग्ण आढळून आले आहेत. ज्यापैकी ७६६ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक ५६८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर दिल्लीमध्ये ३८२, केरळात १८५, राजस्थानमध्ये १७४, गुजरातमध्ये १५२ आणि तामिळनाडू १२१ रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.