
मुंबई | Mumbai
आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या माजी सीईओ आणि एमडी चंदा कोचर (Chanda Kochhar) आणि त्यांचे पती दीपक कोचर (Deepak Kochhar) यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. १ लाखांच्या जामीनावर तात्काळ सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सीबीआयची उच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवली आहे.
वेणुगोपाल धूत (Venugopal Dhoot) यांच्या व्हिडिओकॉन समूहाला (Videocon Group) अवैधरित्या कर्ज दिल्याचा ठपका ठेवत आणि या प्रकरणात मनी लॉन्ड्रींग झाल्याच्या आरोपाखाली कोचर दाम्पत्यास सीबीआयने अटक केली होती. यावर आपल्याला झालेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत कोचर दाम्पत्याने न्ययालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी (६ जानेवारी) झालेल्या सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता.
नेमकं काय प्रकरण?
चंदा कोचर या बँकेच्या सीईओ असताना २६ ऑगस्ट २००९ रोजी उद्योगपती वेणुगोपाल धूत यांच्या मालकीच्या व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सला ३०० कोटी रुपये आणि ३१ ऑक्टोबर २०११ रोजी व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडला ७५० कोटी रुपयांचे कर्ज वितरण मंजुर केले होते.
७ सप्टेंबर २००९ रोजी कर्ज मंजुर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ सप्टेंबर २००९ रोजी एनआरएल या कंपनीच्या खात्यात ६४ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. एनआरएल ही कंपनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांनी स्थापन केली होती. मुळात व्हिडिओकॉन कंपनीला बँकेंला देण्यात आलेलं कर्ज हे नियमव अटींचे भंग करणारे होते, असं सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटलं आहे.