सीमेवर भारताचे ‘तेजस’ तैनात
देश-विदेश

सीमेवर भारताचे ‘तेजस’ तैनात

पाकिस्तानने कुठलीही आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर देणार

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

लडाख सीमेवर चीन बरोबर तणाव सुरु असताना भारताने पाकिस्तानला लागून असलेल्या पश्चिम सीमेवर तेजस फायटर विमाने तैनात केली आहेत. तेजस हे स्वदेशी बनावटीचे हलके फायटर विमान आहे. पाकिस्तानने कुठलीही आगळीक केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानला लागून असलेल्या पश्चिम सीमेवर तेजसची तैनाती केली आहे. IAF deploys LCA Tejas along Pakistan border

फ्लाइंग ड्रॅगनच्या नावाने ओळखले जाणारे तेजसचे पहिले स्क्वाड्रन एअर फोर्सच्या तामिळनाडूतील सुलूर येथील बेसवर तैनात आहे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजसचे कौतुक केले होते. तेजस एलसीए मार्क 1 ए ची खरेदी प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. मे महिन्यात तामिळनाडूतल्या सुलूर बेसवर इंडियन एअर फोर्सची फ्लाईंग बुलेट्स ही 18 नंबरची स्क्वाड्रन कार्यान्वित झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com