
दिल्ली l Delhi
तामिळनाडूमध्ये भारतीय हवाई दलाच्या (IAF) MI-17 हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्यासह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान या १३ जणांच्या पार्थिवांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा देखील किरकोळ अपघात झालेला पहायला मिळाला आहे. आज गुरुवारी सकाळीच पार्थिवांना वेलिंगटनमधून मद्रास रेजिमेंटल सेंटरकडे नेण्यात येत होतं. रेजिमेंटल सेंटरमधून त्यांच्या पार्थिवांना सुलूर एअरबेसकडे नेण्यात येणार होतं.
मात्र, या ताफ्यातील एका रुग्णवाहिकेचे संतुलन बिघडलं आणि ती अनियंत्रित होऊन एका लहानच्या टेकडीला जाऊन धडकली. याबाबतचं वृत्त एका वृत्त वाहिनीने दिलं आहे.
जनरल बिपिन रावत यांचा मृतदेह आज त्यांच्या दिल्ली स्थित घरी पोहोचविण्यात येईल. शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत रावत यांच्या दिल्लीस्थित घरात दोघांचे मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. यानंतर कामराज मार्गावरुन बरार चौकापर्यंत शव यात्रा निघेल, आणि दिल्ली कॅन्टॉन्मेंट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.