भररस्त्यात भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याचे लचके तोडले; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल

भररस्त्यात भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याचे लचके तोडले; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल

हैदराबाद | Hyderabad

गेल्या काही महिन्यांपासून देशात कुत्र्यांची दहशत वाढतच चालली आहे. सातत्याने कुत्र्यांच्या हल्ल्याच्या बातम्या कोणत्या ना कोणत्या शहरातून येत असतात. अशीच धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडली आहे.

हैदराबादमध्ये तीन भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षांच्या लहान मुलावर हल्ला केला. भररस्त्यात कुत्र्यांनी या मुलाचे लचके तोडले, रस्त्यावर मुलाला फरफटत नेले. मुलाच्या रडण्याचा आवाज येताच, त्याचे वडील धावत आले आणि कुत्र्यांच्या हल्ल्यापासून मुलाला दूर नेले. जखमी झालेल्या मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं.

भररस्त्यात भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याचे लचके तोडले; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
VIDEO : भर कार्यक्रमात सोनू निगमला धक्काबुक्की; अंगरक्षक जखमी

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसून येत आहे की, मुलगा रस्त्याने खेळत कुठेतरी जात आहे. तेव्हा पाठीमागून येणारे ३ कुत्रे अचानक त्याच्यावर हल्ला करतात. कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर मुलगा जमिनीवर कोसळतो. त्यानंतर कुत्रे त्याला घेरून चावे घेतात. फरफटत ओढतात. मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडतो.

भररस्त्यात भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याचे लचके तोडले; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अचानक युक्रेनमध्ये दाखल, चर्चांना उधाण...
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com