अख्खं कुटुंब संपलं! दोन मुलांसह उच्चशिक्षित पती पत्नीची विष घेवून आत्महत्या

अख्खं कुटुंब संपलं! दोन मुलांसह उच्चशिक्षित पती पत्नीची विष घेवून आत्महत्या

हैदराबाद | Hyderabad

तेलंगणाची राजधानी हैदराबाद शहरातील कुशाईगुडा भागात एकाच कुटुंबातील चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यामध्ये सॉफ्टवेअर अभियंता, त्याची पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. त्यांची ओळख पटली असून सतीश (पती), वेधा (पत्नी). निशिकेत आणि निहाल अशी त्यांची नाव आहेत. मुलांचं वय ९ आणि ५ वर्ष होतं. पती, पत्नी आधी मुलांना विष पाजलं आणि नंतर आत्महत्या केली अशी माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

अख्खं कुटुंब संपलं! दोन मुलांसह उच्चशिक्षित पती पत्नीची विष घेवून आत्महत्या
चार गावठी कट्ट्यासह आठ जिवंत काडतुसे पकडली, दोघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री कुटुंबाने आत्महत्या केली असल्याचा संशय आहे. दरम्यान पोलिसांना मात्र शनिवारी संध्याकाळी या घटनेची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश आणि वेधा दोघेही सॉफ्टवेअर कर्मचारी होते.

अख्खं कुटुंब संपलं! दोन मुलांसह उच्चशिक्षित पती पत्नीची विष घेवून आत्महत्या
शिर्डीत विवाहित महिलेवर अत्याचार, व्हिडिओ बनवून महिलेला केले ब्लॅकमेल

घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की मुलांच्या दीर्घ आजारामुळे त्यांनी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही.

शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर या दाम्पत्याने हे कठोर पाऊल उचललं असावं, असा पोलिसांना संशय आहे. फ्लॅटमध्ये शीतपेयाची रिकामी बाटली, अज्ञात पावडर असलेली बाटली आणि रिकामे ग्लास आढळून आले.

अख्खं कुटुंब संपलं! दोन मुलांसह उच्चशिक्षित पती पत्नीची विष घेवून आत्महत्या
३० प्रवाशांसह पुण्याला निघालेली खासगी बस पेटली, नगर-पुणे महामार्गावर अग्नितांडव

काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या वानापर्थीमध्येही असंच एक प्रकरण समोर आलं होतं, जिथे एकाच घरातील चार सदस्य संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळले होते. मृतांमध्ये एका १० वर्षांच्या मुलाचाही समावेश होता. हे संपूर्ण प्रकरण एका तांत्रिकाशी संबंधित असल्याचं स्थानिक लोकांनी सांगितलं होतं.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com