अनेक नामांकित कंपन्यांच्या मधामध्ये भेसळ, CSE चा दावा

CSE ने १३ छोट्या मोठ्या कंपन्यांच्या मधाचे तपासले नमूने
अनेक नामांकित कंपन्यांच्या मधामध्ये भेसळ, CSE चा दावा

दिल्ली | Delhi

करोना काळात रोगप्रतीकारक शक्ती वाढविण्यासाठी अनेक जण मधाचे सेवन करत आहेत. त्यामुळे मधाची मागणी वाढली आहे. मात्र आता मधाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशातील अनेक मोठ्या कंपन्यांच्या मधामध्ये भेसळ असल्याची माहिती समोर आली आहे.

अनेक बड्या कंपन्या मधाच्या नावाखाली साखरेचा पाक विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटनं (CSE) केलेल्या तपासातून ही बाब उघड झाली आहे. सर्वाधिक मध तयार करणाऱ्या कंपन्या मधामध्ये साखर मिसळत असल्याचं या तपासाद्वारे समोर आलं आहे. सीएसईनं १३ छोट्या मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले. या कंपन्यांच्या मधात ७७ टक्क्यांपर्यंत भेसळ असल्याचं दिसून आलं. मधाच्या २२ मापदंडांपैकी काही कंपन्या केवळ ५ मापदंडांमध्ये खऱ्या उतरल्याचं माहिती देण्यात आली.

सीएसईने केलेल्या अभ्यासात पतंजली, डाबर, बैद्यनाथ, झंडू, हितकारी आणि एपिस हिमालयसारख्या कंपन्यांचं मध शुद्धतेचं प्रमाण तपासणाऱ्या न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स (NMR) या चाचणीत अयशस्वी ठरलं आहे. मात्र डाबर आणि पतंजलीने या चाचणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान कंपनीची प्रतीमा मलिन करण्याचा या चाचणीमागील प्रयत्न असल्याचं या कंपन्यांचं म्हणणं आहे. आम्ही भारतात नैसर्गिक रित्या मिळणारा मधच एकत्र करतो आणि त्याची विक्री करतो, असा दावाही या कंपन्यांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, डाबर आणि पतंजली या दोन्ही कंपन्यांनी दाव्याचे खंडन केले आहे. कंपन्यांनी म्हटले आहे की, हे दावे प्रवृत्त वाटतात आणि ब्रँड्सची प्रतिमा खराब करणे हे त्यांचे लक्ष्य आहे. त्यांनी विकलेले मध हे भारतीय स्त्रोतांकडून नैसर्गिकरित्या गोळा केले जाते आणि साखर न मिसळता किंवा भेसळ न करता मध पॅकिंग केले जाते, असे कंपन्यांनी स्पष्ट केले. एवढेच नाही तर कंपन्यांच्या मते, भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएएआय) मध चाचणीसाठी ठरविलेले नियम व निकष पाळले जातात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com