जम्मू-काश्मीरमधून 10 हजार जवानांना हटवले

केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय
जम्मू-काश्मीरमधून 10 हजार जवानांना हटवले

नवी दिल्ली | New Delhi -

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून निमलष्करी दलाच्या 10 हजार जवानांना माघारी बोलावले आहे. केंद्रशासित प्रदेशात तैनात करण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या एकूण 100 तुकड्यांना जम्मू काश्मीरमधून तात्काळ माघारी येण्याचा आदेश देण्यात आला आहे. या तुकड्यांना आपल्या तळावर परतण्यास सांगण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं 370 कलम हटवण्यात आल्यानंतर या जवानांना तैनात कऱण्यात आलं होतं. Union Ministry of Home Affairs on Wednesday ordered immediate withdrawal of about 10,000 paramilitary forces personnel from the Union Territory of Jammu and Kashmir

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 40 तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल आणि सशस्त्र सीम बळाच्या प्रत्येकी 20 तुकड्या या आठवड्याअखेर जम्मू काश्मीरमधून हटवल्या जातील. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या एका तुकडीत 100 जवान असतात.

याआधी केंद्रीय गृहमंत्रालयाने याआधी मे महिन्यात केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या 10 तुकड्या माघारी बोलवल्या होत्या. नव्याने तुकड्या माघारी बोलावल्यानंतर आता काश्मीर खोर्‍यात सीआरपीएफच्या 60 तुकड्या तैनात असतील. प्रत्येक तुकडीत 1000 जवान असतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com