
मुंबई | Mumbai
गेल्या काही वर्षांपासून दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान (India & Pakistan Relations) यांच्यातील संबंध हे तणावपूर्ण आहेत. त्यामुळे पाकिस्तानी कलाकार, खेळाडू दरम्यान, पाकिस्तानी अभिनेते, खेळाडू यांना भारतात खेळू देण्यास काही संघटनांकडून विरोध होत असतो. ‘देशभक्त असण्यासाठी शेजारच्या पाकिस्तानमधील किंवा इतर कोणत्याही देशांमधील व्यक्तींबाबत वैमनस्यपूर्ण भावना मनात बाळगण्याची गरज नाही’, अशी स्पष्टोक्ती करत भारतात पाकिस्तानींवर बंदी घालण्याच्या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (High Court Refuses Petition to Ban Pakistani Artist) गुरुवारी फेटाळून लावली.
‘देशातील सर्व कंपन्या, संस्था किंवा व्यक्तींना शेजारच्या पाकिस्तानातील कोणत्याही कलाकार, कलावंत, कंपन्यांसोबत काम करण्यास किंवा त्यांची सेवा घेण्यास बंदी घालावी. तसेच पाकिस्तानी कलावंतांना व्हिसा मंजूर करण्यास प्रतिबंध करावा आणि बंदीचे पालन न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी’, अशी याचिका एका सिनेकलाकाराने दाखल केली होती.
दरम्यान, हायकोर्टाने सांगितले की, या प्रकरणी धोरणात्मक आदेश देण्यासाठी याचिकाकर्त्याने केलेली विनंती आमच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे. कारण कोर्ट सरकार किंवा विधिमंडळाला कुठलेही विशेष धोरण तयार करण्याचे आदेश देऊ शकत नाही. अशा प्रकारे कोर्टाकडून ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोश पी. पुनीवाला यांच्या खंडपीठाने सांगितले की, ही याचिका सांस्कृतिक सदभाव, एकता आणि शांततेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेमध्ये एक प्रतिगामी पाऊल आहे. तसेच त्यामध्ये कुठलीही योग्यता नाही आहे.
याचिकेत काय म्हंटले होते
सिनेसृष्टीतील कलाकार फैझ अन्वर कुरेशी यांनी ही याचिका दाखल केली होती, त्यात त्यांनी म्हंटले होते,‘देशातील सर्व कंपन्या, संस्था किंवा व्यक्तींना शेजारच्या पाकिस्तानातील कोणत्याही कलाकार, कलावंत, कंपन्यांसोबत काम करण्यास किंवा त्यांची सेवा घेण्यास बंदी घालावी. तसेच पाकिस्तानी कलावंतांना व्हिसा मंजूर करण्यास प्रतिबंध करावा आणि बंदीचे पालन न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी’, ‘सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघही खेळत आहे. याचा गैरफायदा घेऊन सिनेसृष्टीतील अनेक जण पाकिस्तानी गायक व कलावंतांनाही निमंत्रित करतील आणि त्यामुळे भारतातील कलावंतांच्या रोजगार संधीवर गदा येईल’, अशी भीतीही कुरेशी यांनी याचिकेत व्यक्त केली होती.