
मुंबई l Mumbai
तामिळनाडुमधल्या कुन्नूर इथं वायुसेनेच्या MI-17V5 हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कर अधिकारी असे एकूण १४ जण प्रवास करत होते.
दरम्यान या अपघातामध्ये आधी ११ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता हेलिकॉप्टरमधील एकूण १४ व्यक्तींपैकी १३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आले आहे.
त्यामुळे अपघातातील एका व्यक्तीवर अजूनही उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे सीडीएस बिपिन रावत यांच्या प्रकृतीविषयी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्यामुळे देशभरात त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या जात आहेत.