जो बायडन यांचा उद्या शपथविधी; अमेरिकेच्या राजधानीला छावणीचे स्वरूप

जो बायडन यांचा उद्या शपथविधी; अमेरिकेच्या राजधानीला छावणीचे  स्वरूप

दिल्ली | Delhi

अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे उद्या (20 जानेवारी) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. बायडन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. त्यांच्या बरोबरच उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरिस हे देखील शपथ घेणार आहेत.

बायडन यांचा शपथविधी समारंभापूर्वी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी जवळपास 35 हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथविधी समारंभ अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. असे सांगितले जात आहे की, या शपथविधी समारंभासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र अनुपस्थित राहणार आहेत. बायडन राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेले काही विवादीत निर्णय पलटू शकतात.

अमेरिकी वेळेनुसार, शपथविधी सकाळी 10 वाजता सुरु होणार आहेत. दरम्यान, वॉशिंग्टनची वेळ भारतीय वेळेहून 10 तास 30 मिनिटं पुढे आहे. शपख घेतल्यानंतर जो बायडन देशाला संबोधित करणार आहेत. असे मानले जात आहे की, या संबोधना दरम्यान बायडन पुढील 4 वर्षांसाठी राष्ट्राप्रतीचे त्यांचे व्हिजन सांगू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, जो बायडन कोरोनाविरोधातील लढा, अमेरिकेची अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासोबतच राष्ट्राची एकता अबाधित ठेवण्यासाठी आपल्या योजनांवर प्रकाश टाकतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com