नवी दिल्ली -

ज्यांना विकास आवडत नाही, ते जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी

विरोधकांवर केला आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. तसेच, उत्तर प्रदेश सरकारला विरोधकांकडून धारेवर धरण्यात आले आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशीचे मुख्यमंत्री योगी यांनी आदेश दिलेले आहेत. तर, विरोधकांकडून आदित्यनाथ यांच्यावर टीकेचा भडीमार सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आता योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

ज्यांना विकास आवडत नाही ते लोकं देशात व प्रदेशात जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत. या दंगलीच्या आड विकास थांबेल व त्यांना त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्याची संधी मिळेल. यासाठीच नवनवीन षडयंत्र रचली जात आहेत. मात्र आम्हाल ही सर्व षडयंत्र ओळखून विकासाची प्रक्रिया पुढे न्यायची आहे. असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.