दिल्ली | Delhi

कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत स्वयंसेवक झालेले हरियाणाचे आरोग्य आणि गृहमंत्री अनिल विज यांना करोनाची लागण झाली आहे. विज यांनी ट्विटरच्या माध्यामातून याबाबतची माहिती दिली आहे.

महिनाभरापूर्वी त्यांनी कोवॅक्सिनचा ट्रायल डोस घेतलेल्या विज करोना पॉझिटिव्ह निघाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. अनिल वीज करोना पॉझिटिव्ह आढळणं हा सोशल मीडियावरील चर्चेचा विषय ठरला आहे.

अनिल विज यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, 'माझा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी अंबाला कँटच्या एका सिव्हिल रुग्णालयात दाखल आहे. तसेच माझ्या संपर्कातील लोकांना लवकरात लवकर करोना टेस्ट करुन घ्यावी.'

करोनाची लागण झालेल्या अनिल विज हे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये सहभागी झाले होते. महिनाभरापूर्वी कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी विज यांनी स्वतःचं नाव दिलं होतं. रोहतकमध्ये त्यांनी लसीचा डोस घेतला होता.