एअर इंडिया विकावीच लागेल - हरदीपिंसग पुरी
देश-विदेश

एअर इंडिया विकावीच लागेल - हरदीपिंसग पुरी

दिवाळीपर्यंत 60 टक्के उड्डाणेच शक्य

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली - आधीच कर्जबाजारी असलेली आणि सध्या कोरोनामुळे आणखी अचडणीत आलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडिया विकावीच लागेल असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले आहे. कोरोना महामारीपूर्वी होणार्‍या एकूण उड्डाणांपैकी 55 ते 60 टक्के उड्डाणे दिवाळीपर्यंत होणार आहेत असेही ते म्हणाले.

ते गुरुवारी एका पत्रकार परिषदेत म्हणाले, एअर इंडियाचे खाजगीकरण आवश्यक आहे. या दिशेने केंद्र सरकार काम करीत आहे. सरकारी विमान कंपनी अडचणीत असल्याने कर्मचार्‍यांना विनावेतन सुटीवर पाठवावे लागत आहे. सरकारची ही विवशता आहे.

एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजीव बन्सल म्हणाले, कोरोना महामारीमुळे एअर इंडियाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कंपनीच्या खर्चात कपात करणे आवश्यक झाले आहे. यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. काही कर्मचार्‍यांना मुदतीपूर्वीच सेवानिवृत्ती देण्याचा विचार केला जात आहे, वंदे भारत मोहिमेंतर्गत फ्रान्स एअरलाईन्स 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत पॅरिस ते दिल्ली, मुंबर्ई आणि बंगळुरू या महानगरांमध्ये 28 उड्डाणे भरणार आहे. अमेरिकी एअरलार्ईन्सची 18 विमाने 17 ते 31 जुलै कालावधीत भारतात येणार आहेत. या व्यतिरिक्त जर्मनीसोबतही चर्चा सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com