The Kashmir Files पाहण्यासाठी 'या' राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना ‘हाफ डे’

मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
The Kashmir Files पाहण्यासाठी 'या' राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना ‘हाफ डे’

दिल्ली | Delhi

सध्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.

भाजपच्या (BJP) नेत्यांकडून हा चित्रपट पाहण्याचं आवाहन करण्यात येतंय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. आता आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनीही 'द काश्मीर फाईल्स' संदर्भात मोठी घोषणा केली आहे.

हेमंत बिस्वा शर्मा यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसांची सुट्टी दिली जाईल असं घोषित केलं आहे. ही माहिती घोषणा त्यांनी ट्विटरवर केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांना 'द काश्मीर फाइल्स' पाहण्यासाठी अर्ध्या दिवसाची विशेष सुट्टी दिली जाईल, हे जाहीर करताना आनंद होत आहे. त्यासाठी त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून दुसऱ्या दिवशी चित्रपटाचे तिकीट जमा करावे लागेल.'

The Kashmir Files पाहण्यासाठी 'या' राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना ‘हाफ डे’
The Kashmir Files चित्रपटावर राऊतांची खोचक प्रतिक्रिया म्हणाले, “पंतप्रधान मोदी काश्मीर फाईल्सचे...”

तसेच मध्य प्रदेशामधेही सर्व पोलिसांना चित्रपट पाहण्यासाठी सुट्टी देण्यात येणार आहे. सोमवारी राज्य सरकारने याबाबतचा आदेश जारी केला आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी डीजीपींना हा चित्रपट पाहण्यासाठी पोलिसांना एक दिवसाची सुट्टी देण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह सर्व आमदार आणि मंत्रीही हा चित्रपट पाहण्यासाठी जाणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com